ठिबक नळ्यांच्या गुंडाळीत अडकले दोन काळवीट; एकाचा मृत्यू, दुसऱ्याला जीवदान

अमळनेर (प्रतिनिधी) कावपिंप्री शिवारात शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्यांच्या गुंडाळीत अडकून एका काळविटाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या काळविटाला शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. शेतकऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून दुसऱ्या काळविटाची सुटका केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कावपिंप्री येथील ज्ञानेश्वर माधवराव पाटील यांच्या शेतात ठिबक नळ्यांच्या गुंडाळीत दोन काळवीट अडकल्याचे ज्ञानेश्वर माधवराव पाटील आणि दिनेश पाटील यांच्या निदर्शनास आले. दिनेश पाटील यांनी तत्काळ वनपाल गुलाब पिंजारी यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर धनंजय पाटील, विनोद पाटील, भैय्यासाहेब पाटील, भूषण पाटील, योगेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी एकत्रित प्रयत्न करून ठिबक नळ्यांचा गुंता सोडवला. यात एका काळविटाची सुखरूप सुटका करून त्याला जंगलात सोडण्यात आले. मात्र, दुसऱ्या काळविटाचा नळ्यांमध्ये अडकून मृत्यू झाला होता.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *