अमळनेरमध्ये महामानवाला अभिवादन: विशाल सोनवणे व व्ही. एस. ग्रुपतर्फे २५०० नागरिकांना अन्नदान

अमळनेर (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त फरशी रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विशाल सोनवणे व व्ही. एस. ग्रुप (VS Group) यांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ सुमारे २५०० हून अधिक नागरिकांनी घेतला.

व्ही. एस. ग्रुप सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. विशेष म्हणजे, हा अन्नदान उपक्रम दरवर्षी बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ राबवला जातो. सामाजिक बांधिलकी जपत, यावर्षीही महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एस. ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने नियोजन केले. यामध्ये प्रामुख्याने उमेश सोनवणे, विकास कुमावत, शुभम शेटे, करण चौहान, शारुख शेख, कृष्णा बिऱ्हाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.

या उपक्रमातून सामाजिक सलोखा, सेवा आणि समर्पणाचा आदर्श दिसून आला. शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अन्नदानाचा लाभ घेतला आणि व्ही. एस. ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *