
पावसाच्या पाण्याने दुकानांचे नुकसान; मारवडच्या व्यावसायिकांचे तातडीने पंचनाम्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे मारवड गावातील अनेक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सर्व नुकसानग्रस्त दुकानांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत तसेच पाण्याखाली गेलेल्या व प्रत्यक्ष नुकसान झालेल्या दुकानांना शासनाच्या नियमानुसार योग्य ती मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत नुकसानग्रस्त व्यावसायिकांच्या वतीने अमळनेरचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त एकही व्यावसायिक शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच पात्र असलेल्या सर्व व्यावसायिकांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे करण साळुंखे, प्रदीप पाटील, घनश्याम बडगुजर, योगेश बडगुजर, नवल न्हाणभो, गणेश धोबी, सोनू सैदाणे, मयूर लोहार, पांडुरंग पाटील यांच्यासह इतर व्यावसायिक बांधव उपस्थित होते.

Leave a Reply