कावपिंप्री बसस्थानकावरून दोन वर्षांच्या मुलासह १८ वर्षीय विवाहिता बेपत्ता

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री येथील १८ वर्षीय विवाहिता आपल्या दोन वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कावपिंप्री येथील सरलाबाई सुनील मोरे (वय १८) या १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आदित्य सुनील मोरे या दोन वर्षीय मुलासह कावपिंप्री बसस्थानकावरून बेपत्ता झाल्या. याबाबत त्यांचे पती सुनील उत्तम मोरे यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, हेकॉ काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *