
मुस्लिम खाटीक समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात २० जोडपे विवाहबद्ध
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर मुस्लिम खाटीक पंच मंडळातर्फे इज्तेमा नगर येथे २० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष युसुफ ए. लतीफ होते.
विवाह सोहळ्याची सुरुवात वाहेद खाटीक यांच्या कुराण पठणाने झाली. या सामूहिक विवाह सोहळ्यास महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश येथून सुमारे ११ ते १२ हजार समाजबांधव उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी वेळ व खर्चाची मोठी बचत झाली. समाजातील नागरिकांनी या उपक्रमाचे आदर्श व अनुकरणीय म्हणून भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र खाटीक समाजाचे माजी अध्यक्ष एल. ए. शेख, हुस्नोद्दीन, इब्राहिम सेठ, जिल्हाध्यक्ष अनवर खाटीक, गुजरात अध्यक्ष फिरोज खाटीक, फौजी शकील, मध्यप्रदेश अध्यक्ष वाहेद खाटीक, कासिम पहलवान, रईस सलीम, अकील खान (दोंडाईचा), अरमान यांच्यासह अनेक पदाधिकारी, जिल्हा व तालुका अध्यक्ष तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील, जळगावचे मुफ्ती हारून करीम सालार, एजाज गफ्फार मलिक, पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मुख्तार खाटीक, उपाध्यक्ष जाकीर खाटीक अब्दुल्ला, सचिव जाकीर गनी, खजिनदार इमरान यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा सचिव हाजी शरीफ व महाराष्ट्र उपाध्यक्ष कैसर खाटीक यांनी केले. जाकीर खाटीक व इमरान खाटीक यांनी आभार मानले.

Leave a Reply