ममता विद्यालयाचा सलग चौथ्यांदा ‘दिशा इम्प्लिमेंटिंग स्कूल’ म्हणून गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) बौद्धिक अक्षम मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या दिशा अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ममता विद्यालयाचा सन २०२१-२२ पासून सलग चौथ्यांदा ‘दिशा इम्प्लिमेंटिंग स्कूल’ म्हणून गौरव करण्यात आला. या यशामुळे सर्वत्र गौरव केला जात आहे.

दिशा अभियान हे दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मुंबई येथील सचिव, आयुक्त कार्यालय पुणे तसेच जय वकील फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून बौद्धिक अक्षम मुलांसाठी वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम पोर्टलमार्फत प्रभावीपणे राबविणाऱ्या तसेच सर्व शैक्षणिक बाबी वेळेवर पूर्ण करणाऱ्या शाळांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. त्यामध्ये ममता विद्यालयाने सातत्यपूर्ण कामगिरी करत सलग चौथ्यांदा हा मान मिळविला आहे. जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतीश धस, राज्य समन्वयक दिशा अभियान निलेश चव्हाण, जिल्हा समन्वयक भरत साळुंखे तसेच सहाय्यक लेखा दिव्यांग सक्षमीकरण विभाग सुरसिंग जाधव यांच्या हस्ते ममता विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंगेश वैद्य, सचिव डॉ. वैशाली वैद्य व संचालक मंडळाने सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *