समाजकार्य महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) : श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन तसेच ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि ज्ञानसंस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी सचिन ज्ञानेश्वर साळवे, यामिनी तुकाराम माळी आणि निलेश साईराम भोये यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाची जीवनशैली, संस्कृती, भाषा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले नाते याविषयी माहिती दिली. प्रा. डॉ. जगदीश सोनवणे आणि प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विशद केले. तसेच क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत ग्रंथालयशास्त्र क्षेत्रातील डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची ओळख करून दिली.

कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ. जे. एस. सोनवणे, संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. भरत खंडागळे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. आर. ढगे, डॉ. एस. आर. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, ग्रंथपाल प्रा. उदय महाजन यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यामिनी तुकाराम माळी यांनी केले. विविध राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात झाला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *