विद्यापीठातील वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळेत अमळनेरच्या स्वयंसेवकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) : जलसंधारण, मृदसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी युवकांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या प्रशिक्षणात अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत प्रेरणा पिंपळे, कोमल जगताप, शिवदास पावरा, पिंटी पावरा, गीता जगताप, सुवार्ता गावित, सचिन साळवे आणि शामराव पारधी या स्वयंसेवकांनी सहभाग घेत वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व, जलसंधारण तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजू नन्नवरे, डॉ. शिवाजीराव भोईटे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ. प्रविण महाले, डॉ. मनोज इंगोले, कृषी विभाग अधिकारी कुर्बान तडवी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, निळकंठ गायकवाड, अनिल भाकरे आणि आदित्य सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तज्ज्ञांनी वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीमुळे भूजल पातळी वाढण्यास, पावसाचे पाणी अडविण्यास तसेच शेती व पर्यावरणाला होणाऱ्या फायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कामातून ग्रामीण भागातील जलसंधारण चळवळीला गती देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. दरम्यान, समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विजयकुमार वाघमारे आणि प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्यास प्रोत्साहित केले. जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *