
साने गुरुजी बालवाडीत गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी बालवाडी विभागात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सलग दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना बालचिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना श्री गणेशाच्या मनमोहक रूपाची तसेच गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे विविध खेळ, मनोरंजक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग घेत धमाल, मजा आणि मस्ती केली.
या कार्यक्रमाला अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सचिव संदीप घोरपडे, सहसचिव ॲड. बाविस्कर, तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. बालवाडीच्या मुख्याध्यापिका लतिका शिंगाणे, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती बडगुजर यांनी केले. बालचिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणेशोत्सवाचा हा उपक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply