
अंबारे-खापरखेडा विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पिरण पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रल्हाद पाटील बिनविरोध
अमळनेर (प्रतिनिधी) अंबारे-खापरखेडा (ता. अमळनेर) येथील विकास सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत सहकार पॅनलचा पराभव केला. निवडणुकीनंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत पिरण भाऊराव पाटील यांची चेअरमनपदी तर प्रल्हाद झुलाल पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीत नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलचे बबन गंभीर सैंदाणे हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित अकरा जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. निवडणुकीनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. सोसायटीच्या संचालकपदी सतीश आत्माराम पाटील, मुरलीधर भिला पाटील, प्रकाश ताथुराव पाटील, देवीदास आनंदा पाटील, मनोज बन्सीलाल पाटील, सुरेश निळकंठ पाटील, हिराबाई विश्वास पाटील, दिगंबर अमृत पाटील आणि केवळबाई भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी पी. एस. महाजन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर सचिव भगवान पाटील यांचे सहकार्य लाभले. नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व किरण भाऊराव पाटील, सतीश आत्माराम पाटील आणि गजेंद्र माधवराव पाटील यांनी केले होते. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाचे खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील तसेच अंबारे, खापरखेडा व परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply