अमळनेरचे क्रीडा संकुल रात्री दारुड्यांचा अड्डा; खेळाडूंना दररोज करावी लागते स्वच्छता

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मारवड रस्त्यावरील शासकीय क्रीडा संकुल रात्रीच्या वेळी दारुड्यांचा अड्डा बनत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत येणारे काही जण परिसरात दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर व इतर कचरा टाकून जात असल्याने सकाळी व्यायाम आणि सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना स्वच्छता मोहीम राबवावी लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या क्रीडा संकुलात दररोज सकाळ-संध्याकाळ युवक व युवती रनिंग, व्यायाम आणि विविध खेळांचा सराव करण्यासाठी येतात. शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा संस्कृतीसाठी महत्त्वाचे असलेले हे संकुल काही असामाजिक तत्वांमुळे अस्वच्छ व असुरक्षित बनत असल्याने खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी मद्यपान करून बाटल्या फोडणे आणि कचरा टाकणे यामुळे परिसराची पवित्रता व सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे पहाटे येणाऱ्या खेळाडूंना सरावाआधी स्वच्छता करावी लागते, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सदर क्रीडा संकुल गावाबाहेर आणि निर्जन स्थळी असल्याने भविष्यात मद्यधुंद अवस्थेत वाद किंवा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी नियमित गस्त घालून कारवाई करावी, अशी मागणी खेळाडू आणि व्यायामपटूंनी केली आहे. वेळीच कठोर उपाययोजना न केल्यास हे क्रीडा संकुल कायमचे दारुड्यांचे अड्डे बनण्याची भीती व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *