जैन सोशल ग्रुप अमळनेरची १३ वी पदग्रहण सोहळा उत्साहात ; अध्यक्षपदी सचिन पारख, सचिवपदी महावीर सिंघवी

अमळनेर (प्रतिनिधी) जैन सोशल ग्रुप, अमळनेरच्या २०२६-२०२७ या वर्षासाठीच्या १३ व्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन १० मे रोजी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथील रोटरी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्षपदी सचिन पारख व सचिवपदी महावीर सिंघवी यांच्यासह नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.

कार्यक्रमाची सुरुवात पूजा पारख आणि रिना पारख यांनी सादर केलेल्या णमोकार महामंत्राने झाली. त्यानंतर आरोही भूपेंद्र जैन हिने गणेश वंदना सादर केली. मावळते अध्यक्ष सौरभ छाजेड आणि सचिव प्रितेश जैन यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन एस. पारख, सचिव महावीर सिंघवी आणि त्यांच्या संचालक मंडळाकडे कार्यभार सुपूर्त केला. शपथविधी समारंभाचे संचालन इंस्टॉलिंग ऑफिसर सचिन ऐन शाह यांनी केले. हा समारंभ इंटरनॅशनल डायरेक्टर सचिन बी. शाह, झोन को-ऑर्डिनेटर सचिन एस. कपाडिया तसेच संस्थापक अध्यक्ष प्रदीप पारख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यानंतर नवीन सदस्यांची पिन सेरेमनी घेण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित माता-भगिनींचा सन्मान करण्यात आला. आशा महेंद्र छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन पारख यांनी अध्यक्षीय भाषणात आगामी वर्षात विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. गौशाळेत जीवदया प्रकल्प, वैद्यकीय शिबिरे, जैन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तसेच महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जैन समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी, भारतीय जैन संघटनेचे सदस्य, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे सदस्य, पत्रकार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन सोशल ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रूपाली कोठारी आणि वृषाली पारख यांनी सूत्रसंचालन केले. महावीर सिंघवी यांनी आभार मानले. अशी माहिती जनसंपर्क प्रमुख कीर्तीकुमार कोठारी यांनी दिली.

 

जैन सोशल ग्रुपची कार्यकारिणी अशी

 

अध्यक्ष : सचिन एस. पारख, सचिव : महावीर सिंघवी, मावळते अध्यक्ष : सौरभ छाजेड, मावळते सचिव : प्रितेश जैन, संस्थापक अध्यक्ष : प्रदीप पारख

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *