रंजाने व मुडी येथील दोन तरुण बेपत्ता; पोलिसांत तक्रारी दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रंजाने व मुडी येथील दोन तरुण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या असून याप्रकरणी संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रंजाने येथील राकेश दशरथ भील (वय २०) हा २१ जून रोजी सेंट्रिंगच्या कामासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने त्याचे वडील दशरथ भील यांनी मारवड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत. दुसऱ्या घटनेत मुडी येथील हिरालाल विठ्ठल भील (वय ३३) हे १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. त्यानंतर आजपर्यंत त्यांचा कोणताही शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलिसांत हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *