
प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची आयईईई महाराष्ट्र विभागाच्या चेअरमनपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स’च्या महाराष्ट्र विभागाच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवड झाली.
डॉ. पाटील हे सध्या मुंबईतील ऐटलास स्किलटेक विद्यापीठाच्या यूजीडीएक्स स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक व संचालक आहेत. त्यांना अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचा सुमारे २८ वर्षांचा अनुभव आहे. आयईईई व असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरीचे ते ज्येष्ठ सदस्य असून विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे फेलो आहेत. त्यांनी १०० हून अधिक शोधनिबंध व सात ग्रंथ लिहिले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र-अध्ययन, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज व डेटा सायन्स या क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. आयईईई महाराष्ट्र विभागाला नवोन्मेषी दिशा देऊन शिक्षण, संशोधन व उद्योगातील सहकार्य वाढविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply