
अमळनेरमध्ये प्रथमच होणार भव्य ‘आखाजी महोत्सव’; खान्देशी संस्कृतीचा अनोखा सोहळा १७ एप्रिल रोजी रंगणार
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील सण-उत्सवांची समृद्ध परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ‘अक्षय्य तृतीया’ अर्थात ‘आखाजी’ हा केवळ सण नसून आपल्या संस्कृतीचा कणा मानला जातो. आखाजी हा दिवस अहिराणी वाङ्मय दिन म्हणूनही साजरा केला जातो. या परंपरेचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देण्यासाठी अमळनेर नगरीत प्रथमच खान्देश साहित्य संघाच्या वतीने गुरुवार, १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एलआयसी कॉलनी, लक्झरी बस स्टॉप समोर, धुळे रोड, अमळनेर येथे भव्य ‘आखाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशी लोककला, पारंपरिक गाणी आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (केंद्रीय अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र) असतील. उद्घाटक म्हणून राजेश पांडे (प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष) उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून अशोक आधार पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर) कार्यभार सांभाळतील. ‘ग्रामीण संस्कृती आणि आखाजी महोत्सव’ या विषयावर प्रा. डॉ. योगिता पाटील (अहिराणी लेखिका, धुळे) प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
महोत्सवात खापरवरील पूर्ण पोळ्या बनविण्याची स्पर्धा, झोक्यावरील अहिराणी गीत स्पर्धा, गौराईची अहिराणी गाणी, घट्यावरील गाणी, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसेच ‘एक मिनिटात उखाणे’ अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अहिराणी शब्द व संस्कृतीवर आधारित चालता-बोलता प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार असून आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. ग्रामीण भागातील बचत गटांकडून अस्सल गावराणी खाद्यपदार्थ व हस्तकला वस्तूंचे स्टॉलही उभारले जाणार आहेत.
या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून स्मिताताई उदय वाघ (खासदार, जळगाव लोकसभा), अनिल भाईदास पाटील (माजी मंत्री, अमळनेर विधानसभा), साहेबराव पाटील (माजी आमदार, अमळनेर), डॉ. बी. एस. पाटील (माजी आमदार, अमळनेर), शिरीष हिरालाल चौधरी (माजी आमदार, अमळनेर), डॉ. परीक्षित बाविस्कर (लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर), प्रशांत मनोहर निकम (उपनगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद), अॅड. व्ही. आर. पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य, जळगाव), विक्रांत भास्करराव पाटील (माजी नगरसेवक, अमळनेर), डॉ. अविनाश रघुराज जोशी (अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर), डॉ. डिगंबर विठ्ठल महाले (अध्यक्ष, मंगळग्रह मंदिर संस्थान, अमळनेर), सचिन बाळू पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर), अमेय प्रकाश मुंदडा (मुंदडा बिल्डर्स, अमळनेर), सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग), प्रविण गंगाराम पाटील (राजू फापोरेकर) (नगरसेवक, अमळनेर), सचिन बळवंत पाटील (नगरसेवक, अमळनेर), प्राचार्य रत्नाताई पाटील (खजिनदार, खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र) आणि रमेश आप्पा बोरसे (सचिव, खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र) उपस्थित राहणार आहेत.
खान्देश साहित्य संघाला मार्गदर्शन करणाऱ्या साहित्यिकांमध्ये कृष्णा आनंदा पाटील (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त), सुभाष मोतीराम पाटील (ज्येष्ठ साहित्यिक), हिरामण अभिमन कंखरे (ज्येष्ठ कवी), गोकुळ गोविंदा बागुल (अहिराणी साहित्यिक), शाहीर नाना पाटील (अहिराणी साहित्यिक) आणि भाऊसाहेब देशमुख (साहित्यिक) यांचा समावेश आहे.
या महोत्सवाच्या पत्रकार परिषदेस खान्देश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी, पू. सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष डॉ. कुणाल पवार, जिल्हाध्यक्ष शरद धनगर, कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे, उपाध्यक्ष डी. ए. धनगर, सचिव उमेश काटे तसेच साहित्य संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
खान्देशी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आयोजित या ‘आखाजी महोत्सवा’स नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply