डॉ. होमी भाभा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेत अर्जुन जोशीचे सुवर्णयश

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सेंट मेरी इंग्रजी विद्यालयातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी व अर्जुन सायन्स अकॅडमीचा अभिमान असलेला  अर्जुन ज्ञानेश जोशी याने डॉ. होमी भाभा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले.

मुंबई येथे दि. १२ एप्रिल रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात अर्जुन जोशी याला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. मान्यवरांच्या हस्ते त्याला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान विषयातील त्याची सखोल समज, नियमित सराव आणि मार्गदर्शक शिक्षिका तसेच त्याची आई सोनल जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यश मिळवले. अर्जुन सायन्स अकॅडमीमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विज्ञान विषयाचे मार्गदर्शन दिले जाते. तसेच नेट, सेट व जी या स्पर्धा परीक्षांसाठी पायाभूत तुकड्या नियमित सुरू असतात. त्याचा लाभ अर्जुनला झाला. सेंट मेरी इंग्रजी माध्यम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. अर्जुन हा सेवानिवृत्त प्राध्यापक पी. जे. जोशी व प्रा. डी. एस. लोहार यांचा नातू तसेच ज्ञानेश आणि सोनल जोशी यांचा सुपुत्र आहे. या उल्लेखनीय यशामुळे अमळनेर व परिसरात पालक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून अर्जुनचे कौतुक होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *