सोमेश्वर महादेवाची ६ रोजी होणार प्राणप्रतिष्ठा, तीन दिवस कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुंदडा नगर २ भागात ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान सोमेश्वर महादेव मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.

प.पू. हभप १००८ श्री संत ईश्वरदास महाराज व गोविंद महाराज यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मुख्य आचार्य म्हणून वै.शा.सं.श्री. अभयशास्त्री जोशी व प्रमुख अतिथी म्हणून मुंदडा बिल्डर्सचे संचालक ओमप्रकाश मुंदडा उपस्थित राहणार आहेत. ४ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते मुंदडानगर २ पर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच विविध पूजा विधींना सुरुवात होणार आहे. ६ रोजी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंदडा सिग्नेचर मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *