
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची अमळनेरमध्ये संघटनात्मक आढावा बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी रविवार अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट देत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या कामकाजाची माहिती दिली. तालुक्यातील बूथची संख्या, प्रत्येक बूथवर नियुक्त करण्यात आलेले बी.एल.ए. तसेच त्यांच्या वयोमानासंदर्भातील माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, ठाकरे सर आणि ॲड. प्रशांत संदानशिव यांनी चर्चेत सहभाग घेतला. कार्यक्रमास तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राजू भाट, तुषार संधान शिव, प्रवीण पाटील, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ पातळीपासून संघटनात्मक बांधणी करण्यासोबतच अनुसूचित जाती विभागाची प्रभावी रचना उभी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
अनुसूचित जाती विभागाची संघटना मजबूत करण्यावर भर
बैठकीत ॲड. अंकुश कटारे यांनी अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या विस्ताराबाबत विशेष चर्चा केली. अनुसूचित जाती विभागाचे अमळनेर तालुका अध्यक्ष भगवान संधान शिव यांनी अमळनेर तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीच्या कामकाजाबाबत आवश्यक माहिती दिली. या चर्चेत सईद तेली आणि दिनेश पाटील यांनी सहभाग घेतला. अनुसूचित जाती विभाग हा काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा असून, या विभागाची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याबाबत ॲड. अंकुश कटारे यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस राहुल मोरे, अनिरुद्ध साळवे, राजेंद्र भोसले आणि अनंत बागुल यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला.

Leave a Reply