मारवड महाविद्यालयाचे प्रा. विजय पाटील यांची एन-मुक्ता स्थानिक शाखा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) : मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ (एबीआरएसएम) संलग्नित एन-मुक्ता प्राध्यापक संघटना स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी झालेल्या बैठकीत प्रा. डॉ. एस. एस. पाटील यांची सचिवपदी, तर प्रा. डॉ. एस. एच. पारधी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. प्रा. डॉ. पी. सी. पाटील, एन-मुक्ता केंद्रीय सचिव यांच्या उपस्थितीत विचारविनिमय करून सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. या निवडीमुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राध्यापकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय व संघटनात्मक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा नव्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले यांनी प्रा. विजय भाईदास पाटील, प्रा. डॉ. एस. एस. पाटील आणि प्रा. डॉ. एस. एच. पारधी यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *