
पतंजली योग समिती अमळनेरतर्फे महिला दिन साजरा; महिला आरोग्यावर डॉ. स्वप्ना पाटील यांचे मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) महिला पतंजली योग समिती, अमळनेर तहसीलतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. यावेळी महिला आरोग्य चिकित्सक डॉ. स्वप्ना नितीन पाटील यांनी महिला व आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका प्रभारी कामिनी पवार यांनी केले. यावेळी संविधान जागर उपक्रमांतर्गत संविधान सभेतील १५ महिला सदस्यांच्या योगदानावर आधारित भूमिका सादर करण्यात आल्या. योग शिक्षक व योग साधकांनी या भूमिका साकारत उपस्थितांना संविधान निर्मितीत महिलांचे योगदान समजावून सांगितले.
या अंतर्गत सरोजिनी नायडू यांची भूमिका भारती कोळी, लीला रॉय-निवेदिता कापडणेकर, हंसा मेहता – माधुरी पाटील, दुर्गाबाई देशमुख – कामिनी पवार, अमृत कौर – प्रतिभा माळी, अम्मू स्वामीनाथन – वैशाली भामरे, पूर्णिमा बॅनर्जी – प्रा. उषा पवार, विजयलक्ष्मी पंडित – रूपाली चौधरी, एनी मास्कारेन – रत्ना भदाणे, दक्षिणायनी वेलायुधन – माधुरी पाटील, कमला चौधरी – ज्योती सूर्यवंशी, सुचेता कृपलानी – रुपाली बोरसे, बेगम एझाझ रसूल – पूजा पाटील, रेणुका रे – रुपाली पाटील, मालती चौधरी – रेखा भागवत यांनी साकारल्या.
यावेळी उपस्थित महिलांना आरोग्यदायी जीवनशैली व सामाजिक बांधिलकीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा माळी यांनी आय.के.डी. क्लासेस हॉल उपलब्ध करून देत सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रत्ना भदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजली योग समिती अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार यांनी केले. आभार रुपाली पाटील यांनी मानले.

Leave a Reply