
भारत टॅलेंट सर्च परीक्षेत कार्तिक निलेश पाटील जिल्ह्यात प्रथम; राज्य गुणवत्ता यादीतही मिळविला मानाचा ६८ वा क्रमांक
अमळनेर (प्रतिनिधी) एज्युमिट ॲकॅडमी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार आयोजित भारत टॅलेंट सर्च (बीटीएस) २०२६ राज्यस्तरीय परीक्षेत अमळनेर येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी कार्तिक निलेश पाटील याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कार्तिकने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ६८ वा क्रमांक मिळविताना जळगाव जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल एज्युमिट ॲकॅडमी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्तिक निलेश पाटील याचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्तिकच्या यशाबद्दल पंचायत समिती, अमळनेरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, विस्ताराधिकारी रावसाहेब पाटील, सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्तिकच्या या यशामुळे अमळनेरसह जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply