मंगळग्रह मंदिराच्या डिजिटल नोटीस बोर्डची यशस्वी चाचणी

अमळनेर (प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिर व्यवस्थापन अधिक सुसूत्र करण्याच्या दृष्टीने मंगळग्रह सेवा संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. श्री मंगळग्रह मंदिरातील डिजिटल नोटीस बोर्डसाठी २१ नोव्हेंबर रोजी अँड्रॉईड टीव्हीवर पर्मनन्ट ऑटो कंट्रोल ॲप इन्स्टॉल करून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

मंदिरातील या डिजिटल व्यवस्थेसाठी ‘मंगल टीव्ही ॲप’ वापरण्यात येत असून, त्याद्वारे मंदिरातील विविध माहिती टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित करता येणार आहे. यात डिजिटल नोटीस व महत्त्वाच्या सूचना, महाप्रसादाचे काऊंटिंग व प्रतीक्षा माहिती, अभिषेक पूजा बुकिंग व प्रतीक्षा, हवनात्मक शांतीपूजेची प्रतीक्षा, विविध पूजा व धार्मिक विधींची माहिती, जाहिराती, प्रायोजकांची माहिती तसेच यूट्यूब व इतर व्हिडिओ लिंक्स अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराशी संबंधित अन्य डिजिटल माहितीदेखील या माध्यमातून भाविकांना पाहता येणार आहे. मंदिरासमोरील टीव्हीवर ॲपची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली असून, ते व्यवस्थित कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाविकांना मंदिरातील आवश्यक माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मंदिर व्यवस्थापन अधिक आधुनिक, सुसूत्र आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने मंगळग्रह सेवा संस्थेचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *