महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या अमळनेर तालुका प्रमुखपदी राजेंद्र पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका प्रमुखपदी मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची तालुक्यातील बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रावर महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र बाबुराव चव्हाण तसेच जिल्हा सरचिटणीस महेंद्र दत्तात्रय पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नियुक्तीनंतर राजेंद्र पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. राजेंद्र पाटील यांच्या नियुक्तीचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून स्वागत होत असून, विविध मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पू. सानेगुरुजी पतपेढीचे संचालक, स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरूळ येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच असंख्य मित्रपरिवाराने राजेंद्र श्रीराम पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *