प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी प्रदान

अमळनेर (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे समाजकार्य विषयातून पीएचडी पूर्ण केल्याबद्दल समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्रा. डॉ. विजयकुमार भास्करराव वाघमारे यांना पीएचडी अधिसूचना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना पीएचडी अधिसूचना देण्यात आली. समाजकार्य विषयातील संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांनी ही शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. या यशामागे त्यांचे संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. सुदाम राठोड, सहयोगी प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, जिल्हा धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे उपकुलसचिव, परीक्षा विभाग वसंत वळवी, प्रा. धनराज ढगे, दीपक संदानशिव आणि मुरलीधर बिरारी उपस्थित होते. प्रा. डॉ. विजयकुमार भास्करराव वाघमारे यांनी समाजकार्य क्षेत्रात केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेत त्यांना पीएचडी प्राप्त झाल्याने समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरसह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *