
अमळनेरमध्ये ‘भूमी सुपोषण’ जनजागर महाशोभायात्रेच्या आयोजनासाठी आज बैठक
खासदार स्मिताताई वाघ व आमदार अनिलदादा पाटील यांची उपस्थिती लाभणार
अमळनेर (प्रतिनिधी) अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात ‘माझा-संकल्प-भूमी सुपोषण’ चळवळ जनजागर महाशोभायात्रा काढण्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन-नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी खासदार स्मिताताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, आमदार अनिलदादा पाटील अध्यक्षस्थानी असतील.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने काळाची गरज असलेली भूमी सुपोषण चळवळ देशभर प्रचारीत व प्रसारीत करण्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे. ‘मेरा संकल्प-भूमी सुपोषण’ या चळवळीचा शुभारंभ श्री भूमी मातेच्या वाढदिवशी अर्थात वर्ष प्रतिपदा व गुढीपाडवा-हिंदू नववर्षारंभ या गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या शुभारंभासाठी माननीय केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान अमळनेर येथे श्री मंगळग्रह मंदिरात येणार आहेत. सदर ऐतिहासिक उपक्रम नितांत सुंदर, नियोजनबद्ध व अत्यंत आखीव-राखीव व्हावा, अशी आयोजकांची मनस्वी इच्छा असून, समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवर व माता-भगिनींनी अधिकाधिक संख्येने या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी केले आहे. दरम्यान, सदर दिवशी महाशिवरात्र असल्याने बैठकीनंतर सर्वांसाठी उपवासाच्या भोजन-महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply