आमदार अनिल पाटील यांच्या शेतात आढळला अजगर; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू

अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शेतात अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. शेतात काम सुरू असताना अचानक अजगर निदर्शनास आल्याने शेतकरी व स्थानिकांमध्ये चर्चा रंगली.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र निखिल पाटील, अविनाश परमार आणि करण चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची काळजीपूर्वक पाहणी करून त्यांनी अजगराचे सुरक्षितपणे रेस्क्यू केले.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी स्वतः अजगर हातात घेऊन सर्पमित्रांच्या धाडसी व सेवाभावी कार्याचे कौतुक केले. सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर त्याला मानवी वस्तीपासून दूर, नैसर्गिक व सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, वन्यजीवांचे संरक्षण करताना नागरिकांनी अशा प्रकारचे साप आढळल्यास त्यांना इजा न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *