
पराभवानंतरही जनसेवा कायम; नरेंद्र चौधरींकडून प्रभागात नागरिकांना मोफत आरओ पाणी वाटप
कडक उन्हात नागरिकांना दिलासा; वर्षभर जलसेवा सुरू ठेवण्याचा संकल्प

अमळनेर (प्रतिनिधी) कडक उन्हाच्या झळांमध्ये नागरिकांची तहान भागवण्यासाठी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांसाठी दररोज घरपोच मोफत थंडगार व शुद्ध आरओ फिल्टर पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर वर्षभर ही जलसेवा सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
कलाविष्णू बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून “जनतेची सेवा हाच खरा धर्म, जनतेची सेवा हाच आमचा संकल्प” या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मोफत आरओ फिल्टर पाणी वाटप ही केवळ सेवा नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि माणुसकीचा जिवंत आदर्श असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
“जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहून दिलासा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. जनहिताच्या कार्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध राहू,” असे नरेंद्र चौधरी यांनी सांगितले.
“सेवाच आमचा धर्म, जनतेचे समाधान हाच आमचा संकल्प,” असे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कडक उन्हाळ्यात मिळणाऱ्या या दिलाशामुळे प्रभागातील नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत होत आहे.
विशेष म्हणजे निवडणुकीतील पराभवानंतरही प्रभागाचे पालकत्व कायम ठेवून नरेंद्र चौधरी यांनी मोफत जलसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

Leave a Reply