वासरे येथून दोन गायींसह म्हैस चोरीला; पशुपालकाचे तीन गुरे लंपास

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वासरे येथे गावाबाहेर कळमसरे रस्त्यालगत गोठ्यात बांधलेली दोन गायी आणि एक म्हैस अशी तीन गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी गुरांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या पशुपालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वासरे येथील देविदास साहेबराव पाटील यांचे गावाबाहेर कळमसरे रस्त्यालगत खळे असून, तेथे गुरांसाठी गोठा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी गुरे बांधलेली असतात तसेच त्यांच्या चाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी गुरांना चारा टाकण्यासाठी गेले असता दोन गायी आणि एक म्हैस जागेवर आढळून आली नाही. अज्ञात चोरट्यांनी ही तीनही गुरे चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर देविदास पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *