अमळनेरात क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात; पारधी स्मारकस्थळी अभिवादन सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) धरतीआबा क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे उत्साहात अभिवादन सोहळा पार पडला. लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद, आदिवासी पारधी क्रांती संघटना आणि एकलव्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका शेजारील क्रांतीवीर समशेरसिंग पारधी स्मारकस्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’ क्रांतीचा इतिहास तसेच जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची माहिती दिली. आदिवासी व पारधी समाजाच्या प्रलंबित मागण्या, शिक्षण आणि विकासाच्या प्रश्नांवरही चर्चा करून समाजबांधवांनी संघटित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद, आदिवासी पारधी क्रांती संघटना व एकलव्य संघटनेचे पन्नालाल मावळे, मधुकर चव्हाण, प्रकाश पारधी, धनराज पारधी, अविनाश पवार, गणेश चव्हाण, राजा सोनवणे, गुलाब बोरसे, नरेश चव्हाण, धनराज मालचे, आनंद पवार, रावसाहेब पवार, यश दाभाडे, दिनेश पारधी, दीपक पारधी, रमेश लोंढे, पप्पू लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रम सुरू असताना अमळनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक पंकज चौधरी, नगरसेवक नाविद शेख, सामाजिक कार्यकर्ते भावेश जैन, पांडू भोई व राहुल कंजर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनीही धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा करण्यात येत आहे. अमळनेरात मात्र लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करून अभिवादन केले जाते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *