
न्यू प्लॉट नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी प्रविण पारेख, कार्याध्यक्षपदी बिपिन पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) न्यू प्लॉट परिसर विकास मंचाच्या नवरात्र महोत्सवासाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रविण पारेख तर कार्याध्यक्षपदी बिपिन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आगामी नवरात्रोत्सवात आकर्षक खाटूश्याम मंदिराचा देखावा साकारण्यात येणार असून, उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपुत, डॉ. संदीप सराफ, पर्यांक पटेल, महेंद्र पाटील तसेच छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे संजय चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रतीक कोराणी, यश पांडे, हेमांग झाबक, अविनाश थावराणी आणि केयुर ठक्कर, सचिवपदी अतुल राजपूत, सहसचिवपदी सचिन झारे, खजिनदारपदी पवन शर्मा, संघटकपदी प्रतिक शाह तर पूजा व्यवस्थापकपदी शुभम वैष्णव महाराज यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून स्वर्णदीप राजपूत, रोहन आठवले, प्रणित झाबक, विशाल खिलोसीया, अमित बितराई, प्रसाद जानवे, रोहीत लोहार आणि निखिल पवार यांचा समावेश आहे.
न्यू प्लॉट विकास मंच आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. शहर व परिसरातील महिला, भगिनी आणि युवतींसाठी हा उत्सव आकर्षणाचे केंद्र ठरतो. उत्कृष्ट नियोजन आणि आकर्षक देखाव्यांमुळे महोत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. गतवर्षी सती माता मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती. ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यंदा खाटूश्याम मंदिराचा आकर्षक देखावा साकारण्यात येणार असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या नवरात्र महोत्सवासाठी न्यू प्लॉट महिला मंच, जैन सोशल ग्रुप, जैन जागृती मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ आणि टिळक मित्र मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभत असते.

Leave a Reply