
चारचाकीच्या धडकेत जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वाराजवळ विद्युत पॉवर हाऊस परिसरात चारचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या नरेश विनायक सैंदाने (रा. राजाराम नगर) यांचा उपचारादरम्यान धुळे येथे मृत्यू झाला. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.५० वाजता हा अपघात झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नरेश विनायक सैंदाने हे मोटारसायकल (क्रमांक एम. एच. १९ ए. एच. ९५८१) वरून घरी परतत असताना मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी (क्रमांक एम. एच. १९ ई. जी. ८२४६ ) वरील चालकाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत नरेश हे मोटारसायकलसह खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने धुळे येथील विघ्नहर्ता खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर २७ सप्टेंबर रोजी त्यांना धुळे येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शून्य क्रमांकाने हा गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

Leave a Reply