
अल्लामा फज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथील अल्लामा फज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी यांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. जळगाव जिल्हा काँग्रेस चिटणीसपदी नियुक्ती झालेल्या ॲड. अ. रज्जाक शेख व सईद सत्तार तेली, तसेच काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड झालेल्या राजू भट यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भागवत आण्णा गुरूजी, सोमचंद संदानशिव, हाजी शेखा मिस्तरी, शब्बीर पहलवान, आमिर खान मिस्री, हाजी ताहेर शेख, साबीर पठाण आणि जहुर मुतवल्ली उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रियाज मौलाना यांनी केले. प्रारंभी शाहरुख सिंगर आणि पत्रकार मुन्ना शेख यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोक पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजहित, लोकसेवा आणि जनकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन केले. भागवत आण्णा गुरूजी यांनी सामाजिक सलोखा, ऐक्य आणि लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.
सत्काराला उत्तर देताना ॲड. अ. रज्जाक शेख यांनी आयोजकांचे आभार मानत काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पी. वाय. पाटील, रविंद्र पाटील, शकील सेठ, हाजी रज्जू शेख, गयास अहलेकर, रुकनोद्दीन अहलेकर, मन्सूर सेठ, जाकीरभाई रद्दीवाले, रहीम तेली, अमजद अली शाह, अशफाक शेख, अनीस सर, मुजीबभाई, अजीजभाई, समूभाई वायरमन, फारुख खाटीक, शब्बीरभाई, अ. रहेमान, जाकीर मिस्री, अकबर सेठ, दिलावर काझी, जावेद पटवे, फिरोज शेख (गॅस), आबीद शेख, हुजेफ शेख यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अल्लामा फज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी यांच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply