मतदार यादी विशेष गहन पुनरावलोकनासाठी अमळनेरात आज-उद्या दोन ठिकाणी विशेष शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी) मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावलोकनासाठी (एसआयआर) अमळनेर शहरात प्रक्रिया सुरू असून, मतदारांना आवश्यक सुविधा मिळावी यासाठी नगरपरिषदेच्या वतीने आज दि. ३० आणि उद्या दि. ३१ जुलै रोजी दोन ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये संबंधित मतदारांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून एसआयआर अर्ज भरता येणार आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार तांबेपुरा सिधी कॅम्प तसेच आठ मजली इमारतीजवळ महादेव मंदिरालगत असलेल्या तरुण कुडापा मित्र मंडळ, शिरूड नाका परिसरात ही शिबिरे होणार आहेत. विशेष गहन पुनरावलोकनाची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून अधिकाधिक एसआयआर फॉर्म भरून घेण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. मतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून मतदार यादीतील आपली नोंद तपासावी आणि एसआयआरची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

तांबेपुरा सिधी कॅम्प

 

तांबेपुरा सिधी कॅम्प येथे आज दि. ३० आणि उद्या दि. ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे. या ठिकाणी भाग क्रमांक १३० ते १३८ मधील मतदारांची नोंदणी व एसआयआर प्रक्रियेचे काम केले जाणार आहे. या शिबिरासाठी पर्यवेक्षक म्हणून सुजित साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९९९३३०८९ आहे.

 

शिरूड नाका परिसरातही शिबिर

 

आठ मजली इमारतीजवळ महादेव मंदिरालगत तरुण कुडापा मित्र मंडळ, शिरूड नाका येथेही आज दि. ३० आणि उद्या दि. ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी भाग क्रमांक १६९ ते १७८ मधील मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. या शिबिरासाठी पर्यवेक्षक म्हणून अजित लांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७०२९२०५४९० आहे.

 

आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन

 

शिबिरात येताना मतदारांनी आधारकार्ड, जन्मतारखेचा पुरावा, मतदान ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असलेल्या तसेच मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी निर्धारित वेळेत शिबिराला उपस्थित राहून एसआयआर फॉर्म भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *