
अमळनेर वाणी समाज महिला मंडळच्या अध्यक्षपदी निर्मला अमृतकर यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) वाणी समाज महिला मंडळ अमळनेरची नूतन कार्यकारिणी शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत सर्वानुमते घोषित करण्यात आली. सभेत मंडळाच्या अध्यक्षपदी निर्मला प्रकाश अमृतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही सभा संस्थापक अध्यक्षा रंजना देशमुख व अरुणा अलई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वाणी समाज महिला मंडळ अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी स्वागत केले. मंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक व महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना नव्या कार्यकारिणीमुळे अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
इतर कार्यकारिणी अशी
उपाध्यक्षा वनश्री अविनाश अमृतकर, कार्याध्यक्ष ज्योती विलास मराठे, सचिव मनिषा महेंद्र शेंडे, सहसचिव शुभांगी उमेश महिंद, खजिनदार राजश्री मनोहर नेरकर, सहखजिनदार हेमा चंद्रकांत पुरकर, सल्लागार स्वप्नाली महेश अमृतकर, प्रीती शैलेश महिंद, निलिमा प्रशांत कुडे, वनिता मंगेश महिंद, संयोजिका मंगला अशोक शिरोडे, साधना कांतीलाल मराठे, कल्पना अरुण येवले, वैशाली चंद्रकांत सोनजे, ज्योती सुनील अमृतकर, प्रेरणा विनोद अमृतकर, नीता दिलीप डेरे, शितल चंद्रकांत मुसळे यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply