
सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल; शाळेतून योगेश पाटील प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलने सलग तिसऱ्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
या निकालात योगेश प्रभाकर पाटील याने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शिवम अर्जुन त्रिपाठी याने ९४ टक्के गुणांसह द्वितीय, देवेश जितेंद्र चोरडिया याने ९० टक्के गुणांसह तृतीय, तर तेजस किशोर पाटील याने ८८ टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळवला. उर्वरित सर्व विद्यार्थीही उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्रकुमार बोहरा, सेक्रेटरी प्रकाश बोहरा, व्यवस्थापन समिती सदस्य मुकुंद बोहरा, डॉ. गौरव बोहरा तसेच मुख्याध्यापक जितेंद्र सिंह यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply