अमळनेर शहर काझीपदी हाफिज अझहर नुरी यांची एकमताने नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टची महत्त्वपूर्ण बैठक हाजी नसिरुद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अमळनेर शहर काझीपदी हाफिज अझहर नुरी यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीत शहर काझी पदासंदर्भात चर्चा करून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीचे शहर काझी नौशाद आलाम हजरत यांनी दिलेला राजीनामा ट्रस्टकडून मंजूर करण्यात आला. त्यानंतर रिक्त झालेल्या शहर काझी पदासाठी सर्व सदस्यांच्या एकमताने शहरातील या रसुल अल्लाह मस्जिदचे इमाम हाफिज अझहर नुरी यांची निवड करण्यात आली.

बैठकीस हाजी शब्बीर अली सैय्यद, ॲड.  रज्जाक शेख, फिरोज खान पठाण, हाजी सलीम बागवान, मोना शेख, नवीद शेख, रियाजोद्दीन शेख, आरिफ भाया तेली, साबिर खान पठाण, आसिफ खान इब्राहिम खान पठाण, गुलाम नबी पठाण, मुस्ताक मुजावर, अमीर खान मिस्तरी, साबिर शेख रुस्तम, अय्युब पठाण यांच्यासह ट्रस्टचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *