
मारवड पोलीस ठाण्यात एपीआय साजिद मन्सूरी यांनी स्वीकारला पदभार ; जिभाऊ पाटील यांना दिला निरोप
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) जिभाऊ पाटील यांची धुळे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शनीपेठ पोलीस ठाण्यातून बदली होऊन आलेले एपीआय साजिद मन्सूरी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानिमित्ताने जिभाऊ पाटील यांना निरोप तर साजिद मन्सूरी यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी धार येथील सामाजिक कार्यकर्ते अलीम मुजावर, मुन्ना मिस्त्री, मांडळ येथील ग्रामस्थ, पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार डॉ. विलास पाटील, बाबुलाल पाटील तसेच पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
पदभार स्वीकारल्यानंतर एपीआय साजिद मन्सूरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जिभाऊ पाटील यांना जसे सहकार्य मिळाले तसेच सहकार्य मला देखील मिळेल, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी मिळून सामंजस्याने भांडण-तंटे सोडविण्यासाठी प्रयत्न करू. तसेच गरज पडल्यास कायद्याचा कठोर वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.” कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहाय्यक फौजदार फिरोज बागवान, दीपक पाटील, सुनील पाटील, पोहेकॉ सुनील आगोणे, विनोद साळी, शरिफखान पठाण, मुकेश साळुंखे, भरत ईशी, भरत गायकवाड, संजय सूर्यवंशी, दिनेश पाटील, प्रविण पारधी, चापोहेकॉ संजय पाटील, धनंजय देसले, रेखा ईशी, स्मिता भाल्डे, पोलीस नाईक मिलिंद बोरसे, युनूस तडवी, राजेंद्र पाटील, प्रविण पाटील, हेमचंद्र साबे, विशाल मोरे, सुमित गिरासे, भावेश देवरे, आसिफ तडवी, कमलेश पाटील, परवेज शेख, माधुरी शिरसाठ, प्रियंका शिरसाठ आणि सायली वाघमारे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. नव्या एपीआय साजिद मन्सूरी यांच्या नियुक्तीमुळे मारवड परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. आभार पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी मानले.

Leave a Reply