
वडिलांच्या वाढदिवसाचा अनोखा उत्सव; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दीपक पाटील यांचा मदतीचा हात!
अमळनेर (प्रतिनिधी) : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोगी ठरावा, या सामाजिक भावनेतून तालुक्यातील वावडे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वावडे हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक मणिलाल लोटन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुत्र तथा वावडे विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पाटील यांनी हा उपक्रम राबविला.
मणिलाल लोटन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपक पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला हातभार लागणार असून, वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक जाणीव जपण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास रडावण येथील लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र प्रल्हाद ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र फकिरा पाटील, आवास संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख, लिलाधर माळी, किशोर ठाकरे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बाबुलाल बिऱ्हाडे, उपशिक्षक समाधान छगन खैरनार, कविता मोतीलाल खैरनार, पाकिजा बाबुलाल पिंजारी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सामाजिक उपक्रम राबविणे निश्चितच प्रेरणादायी असून, वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Leave a Reply