
‘एक पेड अजितदादा के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर महिला शहराध्यक्षा आशाताई चावरीया यांच्या पुढाकाराने ‘एक पेड अजितदादा के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात आशाताई चावरीया यांनी आपल्या कॉलनी परिसरात वृक्षारोपण करून नागरिकांना अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन केले. वाढदिवस किंवा जयंतीसारखे विशेष दिवस सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे साजरे करण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका सौ. लिलाताई पाटील, भावसार ताई, शिरसाठ ताई, साधना ताई जोशी, आशाताई गिते, शोभाताई पाटील तसेच कॉलनीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत परिसर हिरवागार ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply