
गुरुपौर्णिमा उत्साहात भक्तिभावात शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीत गुरु हे ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचे अखंड दीपस्तंभ मानले जातात. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’ या वचनाप्रमाणे गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अमळनेर येथील जी. एम. सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी दिवसभर मंदिर परिसर गजबजून गेला होता.
यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या वतीने शेकडो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे संत गजानन महाराजांच्या महाआरतीने झाली. त्यानंतर जळगाव जनता बँकेचे व्यवस्थापक महेश गर्के, उद्योजक व समाजसेवक गोविंद अग्रवाल तसेच महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाशचंद्र पारख यांच्या हस्ते श्रींचा विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला. कार्यक्रमाला संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार, अशोक भावे महाराज, नितीन भावे महाराज, सेवेकरी रघुनाथ पाटील तसेच गजानन परिवारातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारवड-अमळनेर पायी वारीचे स्वागत
गुरुपौर्णिमेनिमित्त मारवड ते संत गजानन महाराज मंदिर, अमळनेर अशी सुमारे दीडशे ते दोनशे गजानन भक्तांची पायी वारी मंदिरात दाखल झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आलेल्या वारकऱ्यांचे प्रा. आर. बी. पवार, ज्योतीताई पवार, एल. जे. चौधरी, संजय साळुंखे आणि महेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
यावेळी निवृत्त अभियंता विजय भदाणे यांनी सपत्नीक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. महिला भक्तांनी सामूहिक पारायण करून गुरुतत्त्वाविषयीची श्रद्धा व्यक्त केली. सामूहिक पारायणाचे वाचन ज्योतीताई पवार यांनी केले. नामस्मरण, भजन आणि अध्यात्मिक वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महाप्रसादासाठी दातृत्व करणाऱ्यांचा सत्कार
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महाप्रसादासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य तथा उद्योजक गोविंद अग्रवाल यांनी उदार दातृत्व दाखविल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय प्रकाश पारेख, संजय चौधरी, पर्यक पटेल आणि प्रवीण पारेख यांचाही सत्कार करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ गजानन परिवारासह शेकडो भाविकांनी घेतला. या सेवाभावी योगदानाबद्दल संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार आणि महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी दात्यांचे विशेष आभार मानले.
दर गुरुवारी चना महाप्रसादाचे वाटप
संत गजानन महाराज मंदिरात दर गुरुवारी गोविंद अग्रवाल यांच्या दातृत्वातून चना महाप्रसादाचे नियमित वाटप केले जाते. या उपक्रमाचा लाभ दर आठवड्याला अनेक भाविक श्रद्धेने घेत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंदिरास भेट देऊन श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहीत पवार, विजय वाणी, विश्वास पाटील, माजी प्राचार्य एल. जे. चौधरी, महेश पाटील, संजय साळुंखे तसेच संत गजानन महाराज सेवा संस्था, गजानन परिवार, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ आणि सर्व सेवेकरी व भक्तांनी परिश्रम घेतले.
फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शिक्षकांविषयी कृतज्ञता
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्नेहमिलन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वर्गातील अभ्यासापलीकडे विद्यार्थ्यांनी एकत्र येत अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पाडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गुरुवंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोगतातून शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि विद्यार्थ्यांचे उत्तम सादरीकरण उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केली गुरुऋणाची जाणीव
शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील स्थान, त्यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेली भूमिका यावर प्रकाश टाकत ममता चौधरी, मोहन पाटील, प्रेम मोरे, भाग्यश्री मांडोळे आणि लक्ष्मी महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाबरोबरच संस्कार आणि मार्गदर्शनाबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. फार्मसी क्षेत्रातील बदलती आव्हाने, करिअर घडवताना नैतिक मूल्यांची जपणूक आणि व्यावसायिक जबाबदारी याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले. केवळ परीक्षेत यश मिळवणे हे ध्येय न ठेवता संवेदनशील आणि जबाबदार आरोग्यसेवक म्हणून समाजात योगदान देण्याचा सल्ला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेमुळे शिक्षकवृंद भारावून गेला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ममता चौधरी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे गुरुपौर्णिमा

Leave a Reply