गोविंदा आला रे!’च्या जयघोषात साने गुरुजी बालवाडीत रंगला दहीहंडीचा उत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील साने गुरुजी बालवाडी विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘गोविंदा आला रे!’च्या जयघोषात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला, भक्तिगीते आणि नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमानिमित्त शाळा परिसर आकर्षक फुलांची सजावट, रंगसजावट तसेच राधा-कृष्णांच्या मनमोहक वेशभूषांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व त्यांच्या सवंगड्यांचा मनोरा रचून दहीहंडी फोडली. या प्रसंगी उपस्थित पालक आणि शिक्षकही श्रीकृष्णाच्या भक्तिगीतांमध्ये दंग झाले. राधा-कृष्णाच्या रासलीलेत सहभागी होत त्यांनी कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सचिव घोरपडे सर, सहसचिव ॲड. बाविस्कर, सर्व संचालक मंडळ, बालवाडीच्या मुख्याध्यापक शिंगाणे मॅडम, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *