अमळनेरात १७ सप्टेंबरला रक्तदान शिबिर; प्रत्येक रक्तदात्याला ट्रॉली बॅग भेट मिळणार

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद प्रस्तुत व आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या प्रेरणेने अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील दोन केंद्रांवर हे शिबिर होणार आहे.

तेरापंथ युवक परिषदेतर्फे आयोजित हे रक्तदान शिबिर तेरापंथ भवन, न्यू प्लॉट, अमळनेर आणि प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे होणार आहे. ‘रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…’ तसेच ‘थेंब तुमचा, जीवन त्यांचे; रक्तदान ही सर्वोत्तम सेवा… मानवतेचा खरा उत्सव’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात येणार आहे. ‘रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती, मोठा फरक!’ या उद्देशाने सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य आणि नवीन जीवनाचा संदेश देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन तेरापंथ युवक परिषद, अमळनेर तसेच शिबिराचे सहयोगी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर आणि जैन सोशल ग्रुप अमळनेर यांनी केले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *