साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिनाचा कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिनाचा कार्यक्रम झाला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख वक्ते म्हणून नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील व संचालक मगन वामनराव पाटील उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी, डी.वाय. पाटील, विज्ञान शिक्षक डी.ए.धनगर, वैशाली महाजन, हर्षल पवार, यशोदीप बागल, निकिता पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच, भारतातून अधिकाधिक शास्त्रज्ञ घडावेत याकरिता मार्गदर्शन केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी भोंदूगिरीवर प्रहार करून त्या मागचे विज्ञानाचे चमत्कार काय असते याबद्दलचे प्रयोग दाखवले व सर्व उपस्थितींना अवाक केले. विद्यार्थ्यांनी यामध्ये विना आगपेटीचे आग लावणे, अंगात येणे, मंतरलेल्या वस्तू याबद्दलचे प्रयोग दाखवून वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले. याबद्दल प्रा.जयदीप पाटील व कार्यकारी संचालक मंडळांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “आऊट ऑफ द बॉक्स” या नावाचे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुनील पाटील व ज्येष्ठ शिक्षक डी.ए.धनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन यशोदीप बागल व वैशाली महाजन यांनी केले. आभार निकिता पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *