अमळनेरात संत तुकाराम महाराज पालखी मिरवणूक; दगडी दरवाजा व राजे संभाजी चौकात केले स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी)  कुणबी पाटील समाजाच्या वतीने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या धार्मिक व भक्तिमय सोहळ्याला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शहरातील दगडी दरवाजा परिसरात राजे संभाजी व शिवशक्ती मित्र परिवार (अहिरराव परिवार) यांच्या वतीने पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गटनेते पंकज चौधरी, नगरसेवक महेशबापू देशमुख, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक कैलासतात्या पाटील, तुळशीराम हटकर, भरत परदेशी, बाळू पाटील, नविद शेख, प्रतापअण्णा साळी यांच्यासह तेली पंच मंडळाचे परागभाऊ चौधरी, बापू चौधरी तसेच कुणबी पाटील समाजाचे ब्रिजलाल भाऊ पाटील,, गोविंदा पाटील ,दिनेश अहिरराव , अनिल अहिरराव , कैलास अहिरराव सुनील अहिरराव, संदीप अहिरराव ,दीपक अहिरराव, देवेंद्र अहिरराव, निलेश अहिरराव, आकाश अहिरराव, कैलास अहिरराव, राज अहिरराव, यश अहिरराव डॉक्टर रमेश अहिरराव, विवेक आबा अहिरराव,किरण पाटील, संतोष पाटील, स्वामी चौधरी, रुणाल पाटील, भूषण अहिरराव, रोहित अहिरराव, हितेश देसले, समर्थ येवले, राहुल मराठे, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेऊन संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच कुणबी पाटील समाज बांधव व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी राजे संभाजी व शिवशक्ती चौक मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *