
अमळनेर येथील एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये बालविवाहाविरुद्ध जनजागृती मोहीम
अमळनेर (प्रतिनिधी) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( सीबीएससी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अमळनेर येथील एन. टी. मुंदडा ग्लोबल व्युव्ह व्युव्ह स्कूल येथे बालविवाहाविरुद्ध तीन महिन्यांची जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी नाट्यप्रयोग, सेमिनार, भाषणे, चर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्याविरुद्ध जागरूक राहण्याचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका तसेच वकील असलेल्या सौ. तृप्ती शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहामुळे होणारे आरोग्यविषयक, सामाजिक तसेच कायदेशीर दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व आणि बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

Leave a Reply