
अर्थसंकल्पात अमळनेर मतदारसंघावर २५ कोटींचा निधी मिळणार : आमदार अनिल पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील महत्वपूर्ण रस्ते व विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संपूर्ण अमळनेर मतदारसंघात विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांमुळे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले असून काही कामे वेगाने सुरू आहेत. या विकासकामांमुळे मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही आमदार अनिल पाटील यांनी २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवून दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, हा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
अमळनेर तालुक्यातील विविध रस्ते व पुलांसाठी खालीलप्रमाणे मंजूर निधी
मेहेरगाव–धुळे–अमळनेर–चोपडा–खरगोन रस्ता (रा.मा. क्र. १५) कि.मी. ६७/०० ते ६८/५००, ७१/७५० ते ७२/७४० व ७३/५०० ते ७६/२०० सुधारणा (भाग – रेल्वे उड्डाणपुल ते दहिवद फाटा) – ६ कोटी रुपये. मुसळी फाटा–धरणगाव–अमळनेर–शिंदखेडा रस्ता (रा.मा. क्र. ६) कि.मी. ५१/००० व ५७/२०० सुधारणा (भाग – भरवस ते रेल्वे बोगदा) – ४ कोटी रुपये. रा.मा. ३९ ते जांभोरा–ढेकू–हेडावे–अमळनेर–शिरसाळे–वावडे–मांडळ रस्ता (प्रजिमा ५१) कि.मी. २९/६०० ते ३७/५०० सुधारणा (भाग – शिरसाळे ते वावडे) – २.५ कोटी रुपये बोळे–मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–मारवड–निम–कपिलेश्वर रस्ता (प्रजिमा ४९) कि.मी. ४९/०० ते ५४/०० सुधारणा (भाग – कळमसरे ते निम) – २.५ कोटी रुपये चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर–कलाली–निंभोरा–पिंगळवाडे–नंदगाव (प्रजिमा ०३) निंभोरा ते पिंगळवाडे दरम्यान चिखली नदीवरील पुलासाठी पोहोच रस्ता (भाग – कलाली ते मुडी) – २.५ कोटी रुपये. बोळे–मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–मारवड–निम–कपिलेश्वर रस्ता (प्रजिमा ४९) कि.मी. ४०/०० ते ४४/०० सुधारणा (भाग – धार ते मारवड) – २.५ कोटी रुपये. त्याच मार्गावरील कि.मी. २७/००० ते २९/००० मजबुतीकरणासह सुधारणा (रुबजी नगर ते हिंगोणा) – १ कोटी रुपये. बोळे–मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–मारवड–निम–कपिलेश्वर रस्ता कि.मी. ३३/३०० ते ४०/०० सुधारणा (भाग – अमळनेर ते धार) – २.५ कोटी रुपये. बोळे–मोंढाळे–बहादरपूर–फाफोरे–अमळनेर–मारवड–निम–कपिलेश्वर रस्ता (प्रजिमा ४९) कि.मी. १५/०० ते १७/८०० सुधारणा, ता. पारोळा – १.५ कोटी रुपये अशा प्रकारे एकूण २५ कोटी रुपयांची विविध कामे मंजूर झाली आहेत. यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारून वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply