साक्षरतेचा संदेश रंगांतून उमटला; लोंढवे विद्यालयात चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात साक्षरता दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कला शिक्षक डि. आर. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर आकर्षक चित्रे साकारली.

विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक जागृती यांसारख्या विषयांवर आपल्या कल्पकतेला वाव देत चित्रे काढली. रंगसंगती, रेखाटन आणि कल्पकतेचा सुंदर आविष्कार विद्यार्थ्यांच्या कलाकृतींतून दिसून आला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळण्यासोबतच सामाजिक विषयांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *