उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्तम आरोग्यासाठी युवासेनेतर्फे विशेष पूजा व महाआरती

अमळनेर (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे यांच्या उत्तम आरोग्यासाठी व लवकर प्रकृती सुधारावी, या सद्भावनेतून अमळनेर युवासेनेच्या वतीने येथील मंगळ ग्रह मंदिरात विशेष पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि निरंतर जनसेवेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

हा उपक्रम जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना लोकसभा संपर्कप्रमुख निखिल चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा आणि शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर, उपतालुकाप्रमुख राहुल साहेबराव पाटील, उपशहरप्रमुख सनी चव्हाण, शहर संघटक पंकज अरुण चौधरी, उपशहर संघटक यश मोहन साळुंखे तसेच युवासैनिक मनीष हरिश्चंद्र चौधरी, अमन खाटीक, सचिन विलास पाटील, अजय कुंदन पवार, प्रदीप किरण देशमुख आणि कुणाल ज्ञानेश्वर शिरसाट यांनी उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले.

कार्यक्रमास धर्मवीर अध्यात्मिक सेना समन्वयक तथा मंगळ ग्रह सेवाभावी संस्था सदस्य दिलीप आत्माराम बहिरम, शिवसेना शहरप्रमुख विलास सुखदेव कंखरे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख प्रमोद शिंपी यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच मंगळ ग्रह सेवाभावी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकनाथ संभाजीराव शिंदे हे लवकर पूर्णपणे निरोगी होऊन पूर्वीप्रमाणे नव्या जोमाने महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत कार्यरत व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व सकारात्मक वातावरणात पार पडला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *