मंगळग्रह मंदिर परिसरात ‘एसटी विनंती थांबा’ बोर्डाचे अनावरण; भाविक व प्रवाशांची गैरसोय दूर होणार

अमळनेर (प्रतिनिधी)ग्रामीण व शहरी भागातील प्रवासी तसेच मंगळग्रह मंदिराकडे येणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मनिष हरिश्चंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ (एसटी विनंती थांबा) बोर्डाचे अनावरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे एसटी महामंडळाच्या बस या ठिकाणी थांबण्यास अधिकृत विनंती थांबा उपलब्ध झाला असून, परिसरातील नागरिक व भाविकांना बसची प्रतीक्षा करताना मोठा दिलासा मिळणार आहे. जनहिताचा विचार करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या प्रसंगी युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मनिष हरिश्चंद्र चौधरी यांनी प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी हक्काचा एसटी थांबा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मोहन मनोरे, महेंद्र साळुंखे (भाग्यलक्ष्मी लॅब), रामकृष्ण चिंतामण पाटील, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, नागोराज राजाराम धनगर, अमोल नागोराज धनगर, हितेश चौधरी आणि इंजि. निखिल चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ सुरू झाल्यामुळे आता परिसरातील प्रवासी आणि भाविकांना अधिक सोयीस्करपणे एसटी बसची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, या जनहिताच्या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी मनिषभाऊ चौधरी व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

“लोकांचे हित, हेच आमचे कर्तव्य!” या भावनेतून भविष्यातही नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *