शाळा-महाविद्यालयांत गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि समानतेच्या विचारांना उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरासह तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांमध्ये अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

 

जी. एस. हायस्कूलमध्ये अभिवादन

खा. शि. मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक के. पी. पाटील, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, जे. व्ही. बाविस्कर, आर. जे. पाटील, शिक्षकेतर प्रतिनिधी पी. ए. जैन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

तालुका काँग्रेसतर्फे गांधी जयंती

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे सुभाष चौक येथील श्री. लोटन अण्णा चौधरी यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. सकाळी ११ वाजता काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भागवत गुरुजी यांनी महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, त्यागाचे व समानतेचे विचार आणि आजच्या राजकारण्यांचे मनसुबे यावर भाष्य केले.

त्यानंतर जिल्हा पदाधिकारी ॲड. रज्जाक शेख यांनी ‘सर्वधर्मसमभाव व सद्भाव आणि आजची देशातील राजकीय विसंगत परिस्थिती’ याविषयी विचार मांडले. ओबीसीचे जिल्हा पदाधिकारी मनोज पाटील यांनी महात्मा गांधींचे राजकीय विचार आजही दुःखीत, पीडित व तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी किती मोलाचे आहेत, यावर भाषण केले.

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी आरएसएसचे संस्थापक हेडगेवार, गोडवलकर गुरुजी व वीर सावरकर यांचे विचार व कर्तृत्वाची महात्मा गांधींच्या विचार व कर्तृत्वाशी तुलनात्मक मांडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केवळ काँग्रेसऐवजी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करण्याचे आवाहन केले.

यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन केले. शेवटी ताराचंद नाना सूर्यवंशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला लोटन अण्णा चौधरी, सईद तेली, राजेंद्र चौधरी सर, पी. वाय. पाटील, डॉ. रवींद्र पाटील, भिकाजी पाटील, शरद पाटील, राजू भाट, दिनेश पवार, एस. सी. तेले सर, मयूर पाटील आदी उपस्थित होते. गजेंद्र साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

 

मंगरुळ विद्यालयात अभिवादन

 

मंगरुळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, संजय पाटील, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल चव्हाण, सिमा मोरे, सिमा पाटील, प्रविण पाटील, मनोज पाटील, खुशाल पाटील व वस्ती शाळेचे मुख्याध्यापक भटु पाटील आहेर सर तसेच सर्व शिक्षकवृंदांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांना गांधीजींच्या स्वच्छता आणि सत्याच्या विचारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *